Breaking News

भरदिवसा मोटारीतून दीड लाखांची चोरी

पुणे, दि. 13, डिसेंबर - सासवडमध्ये भरदिवसा मोटारीमध्ये ठेवलेली रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्जेराव वसंत जगताप यांचे 1 लाख 53 हजार रुपये चोरट्यांनी चोरले. जगताप कामानिमित्त मित्रासोबत अ‍ॅक्सिस बँकेत आले होते. चारचाकी बँकेबाहेर पार्क करून मित्र दिलीप काळाणे यांच्यासोबत जगताप बँकमध्ये गेले. 

काम आटपून दोघे चारचाकाजवळ आले असता गाडीचा दरवाजा उघडलेला या दोघांना आढळला. गाडीची तपासणी केली असता आसनाखाली जगताप यांनी ठेवलेली 1 लाख 53 हजाराची रक्कम चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर सर्जेराव जगताप यांनी या प्रकरणाची पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.