Breaking News

चोरीस गेलेले संगणक शाळा परिसरातच सापडले,नेवासा पोलीसांचा गौरव

नेवासाफाटा/प्रतिनिधी/- तालुक्यातील पिचडगाव येथील सुदर्शन इंग्लिश स्कूलचे काही महिन्यांपूर्वी अज्ञात चोरांनी चोरून नेलेले संगणक तब्बल एक महिन्या नंतर शाळेच्या परिसरात मिळून आल्याने शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास गोल्हार यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांच्यासह पोलीसांचा गौरव सोमवारी दि.११ डिसेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला.
शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास गोल्हार यांनी पिचडगाव येथील माळरानावर गोरगरिबांच्या मुलांसाठी सुदर्शन इंग्लिश स्कूल सुरू केले.या शाळे साठी अनेक जणांनी काही संगणक भेट दिले होते गोरगरीबांची मुले संगणकीय ज्ञान घेत होती. मात्र अज्ञात चोरट्यांनी शाळेतील संगणकीय कक्ष फोडून सदरचे संगणक घेऊन पोबारा केला होता. या घटनेने शिक्षकांसह विद्यार्थी ही हवालदिल झाले होते.