Breaking News

बालविकास विद्यामंदिर विषबाधा : सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करा - रविंद्र वायकर

मुंबई, दि. 17, डिसेंबर - जोगेश्‍वरी पुर्व येथील बालविकास विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या माध्यमातून झालेल्या विषबाधा प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याच्या सुचना राज्यमंत्री तसेच जोगेश्‍वरीचे आ. रविंद्र वायकर यांनी पोलिसांना केली. त्याचप्रमाणे महापालिकेच्या नियमानुसार बचतगटाचे किचन होते का? याचीही तपासणी करण्याच्या सुचना त्यांनी उपस्थित महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अधिकार्यांना दिल्या आहेत.


13 डिसेंबर 2017 रोजी जोगेश्‍वरी पुर्व, शामनगर येथील बालविकास विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारांतर्गत देण्यात आलेली खिचडी खाल्याने सुमारे 38 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. या घटनेनंतर या सर्व विद्यार्थ्यांवर तातडीने कोकण तसेच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात उपचार करण्यात आले. नागपुर येथे अधिवेशन सुरू असतानाही राज्यमंत्री वायकर सातत्याने स्थानिक नगरसेवक बाळा नर, प्रविण शिंदे, सदानंद परब, रुग्णालयातील डॉक्टर तसेच शिवसैनिकांच्या संपक र्ात होते. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना चांगले उपचार देण्याच्या सुचनाही त्यांनी या सर्वांना दिल्या होत्या. सगळ्या विद्यार्थ्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येत नाही तोपर्यंत ते सतत या सर्वांच्या संपर्कात होते.