Breaking News

उद्धट वैद्यकीय अधिकार्‍यावर कारवाई करण्याचे आदेश

सिंधुदुर्गनगरी, दि. 17, डिसेंबर - लेप्टो साथ आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यात प्रतिनियुक्तिवर रेडी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलेले डॉक्टर ’मंत्री महोदय आपले क ाहीही करू शकत नाहीत’, अशी उद्धट उत्तरे देत सेवा देण्यास नकार देणार्‍या अशा डॉक्टरांवर आरोग्य यंत्रणेसह खुद्द मंत्री महोदयानी कानाडोळा केल्याचा खळबळ जनक आरोप आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यानी केला. या कार्यपद्धती बाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.


जिल्हा परिषद आरोग्य समितीची मासिक सर्वसाधारण सभा आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै समिति सभागृहात पार पडली. जिल्ह्यात थैमान घालणार्‍या लेप्टोच्या पार्श्‍वभूमीवर साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य मंत्र्यानी 7 वैद्यकीय अधिकार्‍याचे पथक जिल्ह्यात पाठविले होते. यापैकी रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे देण्यात आलेले वैद्यकीय अधिकारी हजर होऊनही केवळ दोन तासांची सेवा दिली व पुन्हा माघारी गेले. 

याबाबत सभापती राऊळ यानी त्यांच्याशी चर्चा केली असता ’मंत्री महोदय आपले काहीही करू शकत नाहीत’ अश्या भाषेत बोलल्याचा आरोप राऊळ यानी केला. डॉक्टरांच्या या उद्धट वगणुकीची तक्रार संचालकांपासून आरोग्य मंत्र्यांपर्यन्त करण्यात आली. यावेळी चार दिवसात काररवाई करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. मात्र 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला तरीही कारवाई न झाल्याने सभापती राऊळ यानी तीव्र नाराजी व्यक्त केली.