Breaking News

बम्बार्डियर लोकल लवकरच मध्य रेल्वेवर


मुंबई, दि. 17, डिसेंबर - पश्‍चिम रेल्वेवर धावणारी बम्बार्डियर लोकल लवकरच मध्य रेल्वेवरही धावणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि बदलापूर मार्गावर बम्बार्डियर लोकल सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. पहिली लोकल मध्य रेल्वेच्या सेवेत लवकरच दाखल होणार असून तिच्या बारा फेर्‍या होतील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.