Breaking News

केरळमध्ये ३० हजार विद्यार्थ्यांना ॲपचे प्रशिक्षण

तिरुवनंतपुरम : नाताळच्या सुट्ट्यांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी केरळ सरकारतर्फे राज्यातील ३० हजार शालेय विद्यार्थ्यांना संगणक विज्ञान क्षेत्रातील विशेष तज्ज्ञ मोबाईल ॲप बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्य सरकारद्वारे चालवण्यात येणाऱ्या केरळ मूलभूत सुविधा व तंत्रज्ञान शिक्षण(काइट) या उपक्रमाअंतर्गत 'कुट्टीकोटम'चे सदस्य असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. 'कुट्टीकोटम' हे शालेय विद्यार्थ्यांसाठी चालवण्यात येणारे आयटी नेटवर्क असल्याची माहिती यावेळी काइटचे कार्यकारी संचालक अन्वर सादात यांनी दिली. .