Breaking News

शेवटच्या शेतकऱ्याचे कर्ज माफ होईपर्यंत कर्जमाफी योजना सुरूच राहणार


बुलडाणा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना नवी उमेद देण्याचे काम राज्य शासन करीत असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, या योजनेनुसार बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. ही योजना शेवटच्या शेतकऱ्याला लाभ मिळत नाही तोपर्यंत सुरू राहणार आहे.

नांदुरा येथील कोठारी विद्यालयाच्या प्रांगणात बळीराजा जलसंजीवनी योजनेचा कार्यान्वीतीकरण कार्यक्रम व राष्ट्रीय महामार्ग भूमीपुजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, जहाजबांधणी व जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री पांडुरंग फुंडकर, जि.प अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, खासदार प्रतापराव जाधव, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, आमदार सर्वश्री चैनसुख संचेती, डॉ. संजय कुटे, डॉ.संजय रायमूलकर, डॉ. शशीकांत खेडेकर, ॲड.आकाश फुंडकर, महिला व बालकल्याण सभापती श्वेताताई महाले, नगराध्यक्षा श्रीमती रजनी जवरे, पं.स सभापती अर्चनाताई पाटील, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव श्री. चहल, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराज आदींसह अधिकारी उपस्थित होते