बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील एका बँकेतून दिवसाढवळ्या शस्त्रधारी दरोडेखोरांनी तब्बल १२ लाख रुपये लुटल्याने शनिवारी खळबळ उडाली. सासामुसा बाजारातील पंजाब नॅशनल बँकेत नियमित कामकाज सुरू असताना अचानक प्रवेश केलेल्या ८ दरोडेखोेरांनी शस्त्राचा धाक दाखवत १२ लाख लुटले व घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून बँकेतील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.