Breaking News

सांगली महापालिकेतील रस्ते कामांचा उपमहापौर गटाकडून शुभारंभ

सांगली, दि. 30, डिसेंबर - सांगली महापालिका क्षेत्रातील सुमारे 24 कोटी रूपये खर्चाच्या विविध रस्ते कामांचा शुभारंभ काँग्रेसचे युवा नेते वसंतदादा शेतकरी सहकारी साखर क ारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील व शिवसेनेचे युवा नेते सांगली महापालिकेचे नगरसेवक शेखर माने यांच्याहस्ते शुक्रवारी करण्यात आला. 

महापालिका क्षेत्रातील सांगली, मिरज व कुपवाड या तीनही शहरातील रस्त्यांची मोठ्याप्रमाणात दुरावस्था झाली होती. या अत्यंत खराब व धोकादायक रस्त्यांमुळे वाहनधारकांना पाठीच्या व मणक्याच्या आजार व अपघातांना सामोरे जावे लागले होते. परिणामी नागरिकांनाही मोठा नाहक त्रास सहन करावा लागत होता. 
रस्त्यांच्या या दुरावस्थेकडे शेखर माने यांच्या नेतृत्वाखालील महापालिकेतील उपमहापौर गटाने सातत्याने पाठपुरावा केला होता. महापालिका प्रशासनाकडे नव्याने रस्ते बांधणीसाठी मागणी केली होती. याशिवाय महासभेत महापौर हारूण शिकलगार व आयुक्त रविंद्र खेबूडकर यांनाही जाब विचारला होता. उपमहापौर गटाच्या या जनरेट्यामुळे महापालिका प्रशासनाने 24 कोटी रूपये खर्चाच्या प्रमुख 35 रस्ते कामांना मंजुरी दिली होती.