आग्रा : उत्तर प्रदेशच्या आग्रा शहरातील प्रसिद्ध ताजमहालच्या मागच्या बाजूस यमुना नदीच्या किनाऱ्यावर ड्रोन कॅमेरा आढळल्याने खळबळ उडाली. या ड्रोनच्या कॅमेऱ्यात ताजमहालाचे फोटो व व्हिडीओ आढळल्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्रीय गुप्तचर विभागाचे पथक चौकशी करत आहे. बुधवारी सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांदरम्यान ताजमहालच्या दक्षिणेकडील बाजूस एक ड्रोन उडताना आढळून आले होते. यानंतर गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास रिहान नावाच्या युवकाला यमुना नदी किनाऱ्यावर एक ड्रोन आढळून आल्यानंतर संबंधित प्रकार उघडकीस आला.