Breaking News

शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील सुवर्ण व रौप्य पदक प्राप्त महिला कुस्तीपटूंचा सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकत्याच झालेल्या शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविणारी सोनाली मंडलिक तर रौप्य पदक मिळवणारी धनश्री फंड या महिला कुस्तीपटूंचा अहमदनगर जिल्हा तालिम संघ व छबु पैलवान प्रतिष्ठाणच्या वतीने गौरव करण्यात आला. तसेच विजय तोडमल यांची जिल्हा तालिम संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी राहुरी तालिम संघाचे अध्यक्ष दत्तात्रय अडसुरे, नेवासा तालिम संघाचे अध्यक्ष कुंडलिक दादा चिंधे, महाराष्ट्र कुस्ती प्रिमीयर लीगचे अध्यक्ष पै.वैभव लांडगे, तालिम संघाचे अध्यक्ष नामदेव लंगोटे, पै.रामभाऊ लोंढे, पै.राम नळकांडे, पै.नाना डोंगरे, मोहन हिरणवाळे, युवराज पटारे, विलास चव्हाण,गणपत खेमनर, बल्लू धुमाळ, विक्रम बारवकर, संभाजी निकाळजे, गोकुळ शिंदे आदि उपस्थित होते.
पै.वैभव लांडगे म्हणाले की, मंडलिक व फंड या दोन्ही मुलींनी कुस्तीमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन, जिल्ह्याचे नांव देशपातळीवर नेले आहे. गुणवंत खेळाडूंना शाबासकीची थाप मिळाल्यास त्यांना अजून प्रोत्साहन मिळते. अशा गुणवंत खेळाडूंना योग्य मार्गदर्शनासाठी जिल्हा तालिम संघ व छबु पैलवान प्रतिष्ठाण सदैव त्यांच्या पाठिशी असल्याचे त्यांनी सांगितले.