शहर इलाखा साबांतील भ्रष्टाचाराचे भुत पुन्हा जागले ना.मुंडेंची लक्षवेधी प्रज्ञा वाळकेंवर बडतर्फीची तलवार टांगतीच
नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात गाडलेले शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागातील आमदार कक्ष अपहाराचे भुत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या लक्षवेधीच्या निमित्ताने सरकारसह भ्रष्ट अभियंत्याच्या छाताडावर पुन्हा नाचू लागले आहे. बहुचर्चीत कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांचा कोट्यावधीचा भ्रष्टाचार, चामलवार अहवालातील 75 लाखाची वसूली, कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून गुन्हा दाखल करणे दोषी अभियंत्यांना निलंबीत करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणे हे मुद्दे पुन्हा विधानपरिषद चर्चेला आले आहेत. या निमित्ताने चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह त्यांचे खासगी सचिव श्रीनिवास जाधव यांच्या बदनामीचा नेम धरून असलेल्या टग्यांच्या गोटात दिर्घकाल विश्रांतीनंतर हालचाली गतीमान झाल्या आहेत.
शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार सांभाळतांना श्रीमती प्रज्ञा वाळके यांनी दाखवलेली हातचलाखी गेल्या वर्षभरापासून राज्यात चर्चेचा विषय आहे. मनोरा आमदार कक्षात बोगस कामे करून कोट्यावधीची बेकायदेशीर देयके आदा केल्याचे हे प्रकरण तुमसर मतदार संघाचे भाजपाचे आमदार चरणभाऊ वाघमारे यांनी धसास लावून चौकशी करण्यास भाग पाडले होते. सुरूवातीच्या दहा आमदार खोल्यांच्या कामाची चौकशी करून त्याचा अहवाल मुंबई साबां मंडळाचे अधिक्षक अ भियंता तथा चौकशी अधिकारी अरविंद सुर्यवंशी यांनी सादर केला होता. या अहवालात प्रथमदर्शनी दोषी आढळल्याने दोन सहअभियंत्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात आले होते. व कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांची अकार्यकारी पदावर बदली करण्यात आली होती, यात वाळके यांच्यावर साबां प्रशासनाने विशेष मेहेरबानी दाखविल्याचे आरोप साबां मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर झाले होते. आ. चरणभाऊ वाघमारे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून या अपहारावर सरकारचे लक्ष वेधले होते. तथापी या चौकशी - लक्षवेधीच्या फेर्यातून बाहेर पडण्यात प्रज्ञा वाळके लॉबी यशस्वी झाली आणि प्रकरणाचा धुरळा खाली बसला.