Breaking News

किरकोळ वादातून इसमावर तलवारीने हल्ला.

टिटवाळा, दि. 12, डिसेंबर - किरकोळ वादातून एका तरुणाने तलवारीने हल्ला केल्याची घटना वाशिंदमध्ये घडली. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बाळाराम बबन दळवी (वय-28) असे आरोपीचे, तर संतोष नामदेव कोळेकर (वय-45), असे जखमीचे नाव आहे. 

वाशिंद स्थानकावजवळील बाजारात बाळाराम आणि संतोष या दोघांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. या दुकानावरुन दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता. त्यावेळी आरोपी बाळाराम याने संतोषवर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात संतोष रक्ताच्या थारोळ्यात निपचित जमिनीवर कोसळला. 

त्यानंतर वाशिंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हल्लेखोराला अटक केली. कोळेकरला उपचारासाठी कल्याणच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बाळारामवर 307 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.