Breaking News

प्रलंबीत मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचार्‍यांची निदर्शने

अहमदनगर (प्रतिनिधी)- शासकिय कर्मचार्‍यांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी अहमदनगर जिल्हा राज्य सरकारी नोकर संयुक्त संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली. शासनाचा वेळकाढू धोरणाचा निषेध व्यक्त करुन, डिसेंबर आखेर मागण्या मान्य न झाल्यास संघटना बेमुदत तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला.


स्व.योगीराज खोंडे यांना संघटनेच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करुन, आंदोलनाला प्रारंभ करण्यात आले. यावेळी अध्यक्ष बी.बी. सिनारे, सरचिटणीस रावसाहेब निमसे, कार्याध्यक्ष सुभाष तळेकर, भाऊसाहेब डमाळे, पी.डी. कोळपकर, विलास पेद्राम, राजपत्रीत अधिकारी संघटनेचे महेश घोडके, विठ्ठलराव गुंजाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
शासकिय कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करावा. जुनी पेन्शन योजना सुरु करावी. निवृत्ती वय 60 वर्षे ग्राह्य धरावे. पाच दिवसाचा अठवडा करावा. केंद्राप्रमाणे महिला कर्मचार्‍यांना बाल संगोपन रजा द्याव्या. रिक्त जागा भराव्यात. थकित महागाई भत्ता मिळावा. आदि विविध मागण्या पुर्ण करण्याची संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. 

यावेळी डॉ.मुकुंद शिंदे, पुरुषोत्तम आडेप, सुधाकर साखरे, श्रीकांत शिर्शीकर, कैलास साळुंके, दिनकरराव घोडके, बाळासाहेब वैद्य, संदिप कासार, शशीकांत महामुनी, बी.एस. दंडवते, उमेश गावडे, श्रीमती पालवे, एम.डी. बनकर, नलिनी पाटील आदिंसह सरकारी कर्मचारी व अधिकारी वर्ग आंदोलनात सहभागी झाले होते. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांना देण्यात आले.