Breaking News

नागपुरात यादव बंधूंचे आत्मसमर्पण


नागपूर : नागपूर प्रतिस्पर्धी गुंडांवर प्राणघातक हल्ला करण्याच्या आरोपात फरार असलेले करण आणि अर्जून यादव यांनी शनिवारी नागपूर पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. हे दोघेही असंघटीत कामगार महामंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव यांचे मुलं असून याप्रकरणी मुन्ना यादव अजूनही फरारच आहेत. नागपुरातील चुनाभट्टी परिसरात राहणार्‍या मंगल आणि मुन्ना यादव यांच्यात अनेक वर्षांपासून वैमनस्य आहे. दिवाळीच्या सणाला फटाके फोडण्याच्या क्षुल्लक कारणातून या दोन्ही कुटुंबियात वाद झाला. त्या वादाचे पर्यावसन हाणामारीत होऊन दोन्ही बाजुंच्या लोकांना एकमेकांच्या विरोधात पोलिस तक्रार केली. यामध्ये मंगल गटाकडून दिलेल्या तक्रारीत मुन्ना यादव, त्यांची पत्नी नगरसेविका लक्ष्मी यादव , मुले करण व अर्जुन हे आरोपी आहेत. दरम्यान, लक्ष्मी यादव आणि अवधेश यादव या दोघांना अटकपूर्व जामिन मिळाला. तर, अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत होते. या पार्श्‍वभूमीवर, करण आणि अर्जून यादव या दोघांनी आज, शनिवारी सकाळी धंतोली पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्यांना न्यायालयात उपस्थित केले असून कोर्टाने त्यांना 2 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.