एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांतर्गत नेहरु युवा केंद्राची जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात .

अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या नेहरु युवा केंद्राच्या वतीने एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला युवक युवतींचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये श्रीरामपुरच्या निखील नगरकर याने प्रथम क्रमांक पटकाविला.


टिळक रोड येथील नेहरु युवा केंद्राच्या कार्यालयात पार पडलेल्या स्पर्धेच्या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे, माजी दारुबंदी प्रचार अधिकारी श्रीधर शेळके उपस्थित होते. राष्ट्राच्या विकासाकरीता माझे योगदान हा विषय वक्तृत्व स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. 

या स्पर्धेत प्रथम- निखील नगरकर (श्रीरामपुर), द्वितीय-अमोल राठोड (पाथर्डी), तृतीय विभागून- प्रशिस वर्मा, प्रताप भवाळ (नगर) यांनी बक्षिसे पटकाविली. विजेत्या स्पर्धकांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आली. प्रथम क्रमांकास 5 हजार रु., द्वितीय 3 हजार रु., तृतीय 1 हजार रुपये व प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरुप होते. तसेच इतर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. 

परिक्षक म्हणून सोनाली दिलवाले व अमृता ताठे यांनी काम पाहिले. या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नेहरु युवा केंद्राचे स्वयंसेवक राजश्री काळे, रविंद्र लामखडे, रमेश गाडगे आदिंनी परिश्रम घेतले.