शेतात काम करत असताना सर्पदंशाने महिलेचा मृत्यू


गडचिरोली : शेतात धानाची बांधणी करीत असलेल्या महिलेला विषारी सापाने दंश केल्याने तिचा नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, ७ डिसेंबर रोजी चामोर्शी तालुक्यातील घारगाव येथे घडली. 

संगीता दत्तू बोरकुटे (३५) असे मृतक महिलेचे नाव आहे. ही महिला पुरुषोत्तम भगत यांच्या शेतात धानाची बांधणी करण्याकरिता गेली होती. दरम्यान, तिला विषारी सापाने दंश केला. तिला लागलीच उपचारासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या पार्थिवावर वैनगंगा नदीवरील हरणघाट घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले..