झायरा वसीम असभ्य वर्तन प्रकरणी अज्ञाताविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल
मुंबई, दि. 11, डिसेंबर - दिल्ली-मुंबई प्रवासादरम्यान झायरा वसीम हिच्याशी असभ्य वर्तन केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात बाल अत्याचार प्रतिबंध क ायद्यांतर्गत (पॉस्को) गुन्हा दाखल केला आहे.झायरा विस्तारा एयरलाईन्सच्या एका विमानाने दिल्ली-मुंबई असा प्रवास करतांना तिच्या पाठीमागे बसलेल्या अज्ञात प्रवाशाने तिची छेडछाड केली.
प्रवासादरम्यान विमानातील लाईट बंद असल्याने अज्ञात इसमांनी याचा फायदा घेतला. या प्रकरणी झायराने विमानातील कर्मचार्यांकडे तक्रारही केली. मात्र तिच्या तक्रारीची दुर्लक्ष करण्यात आल्याचे झायराने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले. त्यानंतर मुंबई पोलीस, नागरी उड्डयन मंत्रालय व विस्तारा एअरलाईन्स प्रशासन सक्रीय झाले आहे.
