वाढदिवशीच सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू
रत्नागिरी, दि. 11, डिसेंबर - लांजा तालुक्यासह राजापूर, रत्नागिरी शहरात सर्पमित्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुजित कांबळे (वय 40, रा. लांजा) यांचा वाढदिवसाच्या दिवशीच सर्पदंशाने मृत्यू झाला.
सुजित काल (दि. 9 डिसेंबर) सायंकाळी पाचच्या सुमारास तो कुवे येथे कामानिमित्त गेला होता. दुचाकी उभी करून उभा असताना गवतातून आलेल्या कोब्रा जातीच्या विषारी सापाने त्याला दंश केला. दंश करून जाणार्या सापाला त्याने पाहिले आणि त्याच अवस्थेत त्याने घरी फोन करून सर्पदंश झाल्याचे कळविले.
नातेवाइकांनी कुवे येथे धाव घेतली. ते कुवे येथे पोहोचले, तेव्हा सुजित कांबळे दुचाकीवर डोके टेकून बसला होता. नातेवाइकांनी त्याला तत्काळ लांजा ग्रामीण रुग्णालयात हलविले. तेथे उपचार करून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री साडेसात वाजता त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच मृत्यू झाला.
सुजितचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाइकांनी हंबरडा फोडला. काही तासांपूर्वी घरातून गेलेला सुजित वाढदिवस असल्यामुळे लवकर घरी येणार होता. तो घरी येण्याऐवजी त्यांचा मृतदेहच घरी पोहोचल्याने सर्वत्र सन्नाटा पसरला. त्याच्या पश्चात पत्नी, दोन छोटी मुले असा परिवार आहे.