Breaking News

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या प्रलंबीत प्रश्‍नांसाठी संभाजी ब्रिगेडचे धरणे


अहमदनगर/प्रतिनिधी। संभाजी ब्रिगेड आणि वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या वतीने ओबीसी, एससी, एसटी, व्हीजीएनटी व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या प्रलंबीत शिष्यवृत्ती करिता शिक्षणमहर्षी भाऊसाहेब जाधव - पंजाबदार देशमुख यांच्या जयंती दिनी दि.27 रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहीती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोरख दळवी यांनी दिली आहे. यावेळी सन 2014-15, 2016-17 मधील शिष्यवृत्तीची रक्कम तात्काळ मिळावी, 2017 - 2018 मधील शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुरु करुन रक्कम तात्काळ विद्यार्थाच्या खात्यात जमा करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.