Breaking News

विषमुक्त सेंद्रीय शेतीवर मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी, दि. 16, डिसेंबर - निसर्गातील ऋतुमानाच्या सहकार्याने विषमुक्त सेंद्रीय शेती केल्यास सरासरी 30 ते 32 टन एकरी उसाचे उत्पन्न 100 ते 120 टना पर्यंत जाऊ शकते याचे यशस्वी प्रयोग झाले आहेत,सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही विषमुक्त शेती व उत्पादन वाढ़ीचे प्रयोग करणार असल्याचे, प्रतिपादन कृषी विभाग प्रमुख डॉ. भालचंद्र पोळ यांनी आयोजित शिबिरामध्ये बोलताना केले.


सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उतपन्न बाजार समितीच्या वतीने जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या सभागृहामध्ये डॉ. पोळ यांच्या विषमुक्त शेतीवर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी कृषी उतपन्न बाजार समितीच्या वतीने डॉक्टर भालचंद्र पोळ यांचा सत्कार करण्यात आला.