Breaking News

ग्राहक मंचचा इन्शुरन्स कंपनीला दणका.


सिंधुदुर्गनगरी, दि. 16, डिसेंबर - अपघातग्रस्त ट्रकच्या नुकसान भरपाई ची रक्कम देण्यास टाळाटाळ करणार्‍या विमा कंपनी ला ग्राहक मंचाने नुकसान भरपाईची 9 लाख 80 हजाराची रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत.ओरोस- बुद्र्रुक येथील श्री विवेक मलबारी यानी 27 फेब्रुवारी 2013 रोजी अशोक लेलैंड कंपनीचा ट्रक खरेदी केला होता , या ट्रक(चक07द-0963) ला 8 जुलै 2013 रोजी म्हापसा येथे अपघात झाला होता.

या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते त्यामुळे वाहनाची नुकसान भरपाई मिळावी यासाठी विमा घेतलेल्या खउखउख लोम्बार्ड या विमा कंपनी कडे मलबारी यानी प्रस्ताव सादर केला होता मात्र या विमा कंपनी ने विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने मलबारी यानी ग्राहक मंचाकडे धाव घेत दाद मागितली होती, ग्राहक मंचाचे अध्यक्ष प्रदीप निटूरकर, सदस्य अशोक सोमवंशी, श्रीमती वफ़ा खान यानी सदर विमा कंपनी ला नुकसान भरपाई ची 9 लाख 79 हजार 766 रुपये ही रक्कम 30 दिवसात देण्याचे आदेश दिले व आदेशाचे पालन न केल्यास तक्रा रदारास तक्रार दाखल केलेल्या 28 जानेवारी 2016 या दिनांका पासून रक्कम अदा क रेपर्यंत 6%दराने व्याज द्यावे तसेच मानसिक त्रासापोटी 3 हजार व तक्रारअर्जच्या ख़र्चपोटी 3 हजार रुपये देण्याचे ही आदेश दिले.