Breaking News

महिला उद्योजकांसाठी शासनाचे विशेष धोरण !

पालघर, दि. 17, डिसेंबर - राज्याच्या आर्थिक विकासात महिला उद्योजकता महत्त्वाचा स्त्रोत मानली गेली आहे. महिला उद्योजक समाजामध्ये व्यवस्थापन, संघटन व व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये निरनिराळे आयाम प्रस्तुत करीत आहेत. तथापि महिलांनी परीचालीत केलेल्या उपक्रमांची संख्या ही एकूण उपक्रमांच्या प्रमाणात फारच कमी आहे. आजच्या आधु निक गतिमान युगात शाश्‍वत आर्थिक व सामाजिक विकासाच्या जागतिक वाटचालीमध्ये महिला उद्योजकांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. महाराष्ट्र राज्यात महिलांनी समाजामध्ये जरी मोलाची भूमिका निभावली असली तरीही अनेक कारणांमुळे त्यांच्यावरील उद्योजकीय कार्यक्षमतेला पुरेसा वाव मिळालेला नाही.


सद्यस्थितीत महिला उद्योजकांपुढे लिंगभेद व समाजातील स्थान, व्यवसाय सुरु करण्यासाठी अपुरे स्त्रोत, तांत्रिक व व्यवस्थापकीय ज्ञानाचा अभाव, मर्यादित आर्थिक स्त्रोत व गुंतवणूक सहाय्य, परवडण्याजोग्या व सुरक्षित व्यावसायिक जागांचा अभाव इत्यादी अनेक आव्हाने आहेत. राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी महिलाचलित उपक्रमांच्याद्वारे आ र्थिक व सामाजिक बदल घडवण्यास प्रोत्साहन देणारे जागतिकदृष्ट्या सक्षम व्यवसाय केंद्र बनविणे व महिला उद्योजकांसाठी पोषक वातावरण निर्माण करणे, या दृष्टीकोनातून महिला उद्योजकांसाठी सक्षम धोरण राबविण्यात येणार आहे.