बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू.
बहराइच : बिबट्याच्या हल्ल्यात एका ८ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशच्या बहराइच जिल्ह्यात शुक्रवारी घडली. सायंकाळच्या सुमारास कतर्नियाघाट सेंचुरी जंगलानजीकच्या हरखापूर गावात मुबीन नावाचा मुलगा घराबाहेर खेळत असताना बिबट्याने अचानक हल्ला केला.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुबीनचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने पीडिताच्या कुटुंबीयांना १० हजार रुपयांची रोख रक्कम दिली असून नुकसानभरपाई म्हणून लवकरच ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आल्याची माहिती वनविभागाचे अधिकारी जी. पी. सिंग यांनी दिली
