Breaking News

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात दोन पाहुण्या बछड्यांचे आगमन

मुंबई / चंद्रपूर, दि. 17, डिसेंबर - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील माया नावाच्या वाघिणीने नुकताच दोन बछड्यांना जन्म दिला आहे.शुक्रवारी येनबोडी परिसरात ती एका बछड्याला तोंडात पकडून रस्ता ओलांडताना दिसून आली. तर, दुसरा बछडा तिच्या मागे होता. विशेष म्हणजे माया वाघिणीने पिल्लांना जन्म देण्याची ही तिसरी वेळ आहे. मटकासूर नावाने लोकप्रिय वाघ त्यांचा पिता आहे. माया वाघिणीसोबत सध्या 2 पिल्ले दिसत असली तरी तिने नक्की किती पिल्लांना जन्म दिला आहे या बाबत अजून माहिती मिळालेली नाही.