पोलिसांपासून बचाव करण्यासाठी चोरट्यांनी घरालाच लावली आग.
भायखळा येथील गंगा बावडी पोलीस लाईन माझगाव येथे राहणारे राहुल केसर यांनी पोलिसांना माहिती दिली की, त्यांच्या घरात चोर शिरले आहेत. या माहितीवरून भायखळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आपण पकडले जाणार या भीतीने दोघा सराईत चोरट्यांनी घराला आतून कडी लावून घेतली होती.