Breaking News

चौकशीसाठी एकनाथ खडसेंचा भाचा पोलिसांच्या ताब्यात.

नवी मुंबई : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी गोरे (बिंद्रे) बेपत्ता प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना अटक केल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे भाचे राजेश पाटील यांना जळगाव येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 


ज्या दिवशी अश्विनी गोरे बेपत्ता झाल्या, त्या काळात राजेश पाटील व पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्यात मोबाइलवर संभाषण झाले होते तसेच त्या कालावधीत राजेश पाटील हा जळगावहून मुंबईत आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे राजेश पाटील याचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे राजेश पाटील याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.