Breaking News

रुळाला तडे गेल्याने सलग दुस-या दिवशी हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत

मुंबई, दि. 13, डिसेंबर - मानखुर्दजवळ रुळाला तडे गेल्याने हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे गाड्या पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत आहेत. ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे विस्कळीत झाल्यामुळे कामाला जाणा-या नागरिकांचे हाल होत आहेत.


हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत होण्याचा आजचा दुसरा दिवस आहे. मंगळवारी देखील चेंबूरजवळ रुळाला तडा गेल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. दुरुस्तीची कामे आणि वेगमर्यादेमुळे हार्बर मार्गावरील लोकल नेहमीच उशिरा धावतात. सततच्या या समस्यांमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.