Breaking News

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची ‘सुयोग’ला भेट

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज सकाळी सुयोग पत्रकार निवासाला भेट देऊन पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. एस. टी. महामंडळाच्या कारभारात पारदर्शकता व गतिमानता यावी यासाठी अनेक निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. श्री. म्हणाले की, बसच्या वेळा व चालक-वाहकांच्या ड्युटी याबाबत संगणकीकृत प्रक्रिया राबवली जाणार आहे. 


त्यामुळे ड्युटीवाटपात पारदर्शकता येईल व बसच्या वेळा नियमित होऊन विद्यार्थी, तसेच रोज प्रवास करणारे नागरिक यांना लाभ होईल. पदभरती व परवाना प्रक्रियाही ऑनलाईन करण्यात आली आहे. १५ वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना पुनर्प्रशिक्षण दिले जाणार आहे. केवळ वातानुकुलितच नव्हे तर इतर बसही अधिक आरामदायी व्हाव्यात, यासाठी बदल केले जात आहेत.”

अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही चर्चा पार पडली. शिबिरप्रमुख दिलीप जाधव, तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे इर्शाद बागवान यांनी स्वागत केले.