Breaking News

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारीमुळे वाचले शेतकऱ्याचे प्राण.


जामखेड/ ता.प्रतिनिधी/ - जामखेड पासून 5 किलोमीटर अंतरावर रत्नापुर फाट्याजवळ रोडवरील खड्ड्या मध्ये मोटार सायकल व चारचाकी महेंद्रा कंपनीची के. यु. व्ही (KUV) MH16 BH 8552 ) गाडीची आमने-सामने जोरदार टक्कर झाली. 

सचीन आनंदराव घुमरे जामखेड हुन तर श्रीराम गिते आपल्या गावाकडे म्हणजे भातोडी ता आष्टी कडे जात आसतांना कर्जत रोडहुन जामखेड ला जात आसतांना त्यांच्या वाहनाची समोरासमोर धडक होऊन श्रीराम शंकर गीते वय (55) हे जबर जखमी झाले. घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शीनी 108 ला फोन लावला असता जामखेड येथे 108 रुग्णवाहिका बाहेर गेली असल्यामुळे उपलब्ध झाली नाही.

मात्र सदर घटनेची माहिती कळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी आपली रुग्णवाहिका घेऊन अवघ्या 6 मिनिटात घटनास्थळी जाऊन जखमी गीते यांना आणून ताबडतोब दवाखान्यात दाखल केले व तत्परता दाखवून त्यांचे प्राण वाचवले , गीते यांच्या डोक्याला जबर मार लागला असून उजवा पाय मोडला आहे. श्रीराम गीते हे गरीब शेतकरी असून त्यांची परिस्थिती अत्यंत गरीब आहे. ओम हॉस्पिटल येथे दाखल केल्यानंतर लवकरच त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल असा विश्वास दाखवला . यावेळी गणेश देवकाते. लहु शिंदे अंकुश शिंदे सुनील चोरडीया , सागर नेटके, आशिष काळे, राजू गोरे, आदींनी मदत केली.यावेळी जखमी चा मुलगा सुधीर (मुन्ना) गिते याने संजय कोठारी यांच्यामुळेच माझे वडील वाचले, मी त्यांचे फार फार आभारी आहे.