Breaking News

बंदी असलेल्या कीटकनाशकांची श्रीगोंदयात होते खुलेआम विक्री

श्रीगोंदा/प्रतिनिधी/: बंदी घातलेल्यां पैकी चार ते पाच औषधांची खुलेआम विक्री होत असून, श्रीगोंदा तालुक्यातील कृषी विभाग या प्रकाराकडे रीतसर कानडोळा करताना दिसत आहे. 

शेतामध्ये फवारणी करताना विषबाधा होऊन विदर्भात अनेक शेतकर्‍यांचे प्राण गेले आहेत. त्यामुळे, शासनाने कीटकनाशक औषधांचे नमुने घेऊन औषधांच्या वापरावर बंदी घातलेली आहे; शेतामध्ये कीटकनाशके फवारणी करताना विषबाधा झाल्याने यवतमाळ, अकोला, आदी जिल्ह्यात अनेक शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, शासनाने अनेक औषधांचे नमुने घेऊन धोकादायक असलेल्या औषधांवर बंदी घातली आहे.

शेतकर्‍यांच्या जीवावर उठलेल्या या औषधांच्या विक्रीवर बंदी असतानाही श्रीगोंदा तालुक्यातील अनेक ठिकाणी ही औषधे मिळत आहेत. काही दुकानात औषधे नसल्याचे विक्रेते सांगत असले तरी, ओळखीच्या लोकांना या औषधांचा पुरवठा करण्यात येतो. अनेक बंदी असलेल्या औषधांची विक्री करण्यात येत असल्याचे समोर आले. तालुक्यातील काहीं दुकानदारांनी शक्कल लढवून एकही औषध दुकानात ठेवलेली नाही. ही औषधे ग्राहकाने मागितल्यास त्याला गोडावून मधून काढून देण्यात येते.


 तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्र संचालकानी औषध उपलब्ध असल्याचे सांगितले.मात्र बंदी असलेल्या चार औषधांची सर्रास विक्री होत असल्याचे उघड झाले आहे.त्याची खुलेआम विक्री करण्यात येत आहेत. शेतकर्‍यांसाठी धोकादायक ठरलेली ही औषधे कृषी विभागाच्या आशिर्वादाने बिनदिक्कतपणे तालुक्यात विकण्यात येत आहेत. त्यामुळे श्रीगोंदा ताालुक्यातील शासकीय यंत्रणा श्रीगोंदयाचा विदर्भ होण्याची वाट पाहत आहे की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.