Breaking News

भुमिअभिलेखच्या लिपीकास लाच घेतांना रंगेहाथ पकडले.


जामखेड/ता.प्रतिनिधी/-तालुक्यातील मोहरी येथिल सरपंच युवराज हाळनोर यांच्या कडुन सर्वे नंबर गाव नकाशाचा उतारा देण्यासाठी भुमिअभिलेख लिपिक संतोष थोरात याला ५००/- रु लाच घेताना अहमदनगर च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.या मुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून लिपीका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मोहरी येथील तक्रारदार सरपंच यांना आपल्या मोहरी येथिल सर्वे नंबर गाव नकाशाचा उतारा हवा होता. त्यानुसार त्यांनी भुमिअभिलेख कार्यालयातील लिपीक संतोष मधुकर थोरात( वय, ३२) यांच्या कडे सर्वे नंबर चा गट, नकाशाचा उतारा, मागीतला वेळी त्यांना तो न देता फक्त गाव नकाशा देण्यात आला. त्यामुळे पुन्हा सरपंच हाळनोर यांनी लिपीक संतोष थोरात यांच्या कडे चार दिवसान पुर्वी सर्वे नंबरचा गाव नकाशाची मागणी केली होती.


 त्यावेळी त्यांच्याकडे पाचशे रुपयांची मागणी केली त्यामुळे सरपंच हाळनोर यांनी सदरची माहीती नगरच्या लाचलुचपत विभागाच्या पथकास कळवली त्यानुसार या पथकाने दि ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भुमिअभिलेख कार्यालयात सापळा लावून भुमिअभिलेख कार्यालयातील लिपिक संतोष थोरात यांनी मोहरी चे सरपंच युवराज हाळनोर यांच्या कडुन ५०० रू मागणी करून ४०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

रात्री उशिरा लिपीक संतोष थोरात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई लाचलुचपत विभागातील नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक शाम पवरे, पो हे कॉ नितीन दराडे एकनाथ अव्हाड, तनवीर शेख पो. ना. प्रशांत जाधव या पथकाने केली आहे.

या पुर्वी मागील वर्षी जमिनीची वारस नोंद लागण्यासाठी सरपंच युवराज बाबासाहेब हाळनोर यांच्या कडुन एका कामगार तलाठ्याने ७ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यावेळी देखील सरपंच हाळनोरनी अहमदनगर च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून कारवाई केली होती.