Breaking News

सोशल मीडियाच्या माध्यमातुन जाजू परिवाराचे दुसरे आंतरराष्ट्रीय संमेलन

अकोले (प्रतिनिधी) येथील पत्रकार अजय जाजू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातुन भारतातील 850 जाजू परिवाराच्या माहितीचे संकलन करून गत वर्षी 750 जाजू सदस्यांचा मेडता रोड (राजस्थान) येथे स्नेहमिलन समारंभ आयोजीत केला होता. यंदा हे दुसरे वर्ष असुन, यंदा हा सोहळा 23 व 24 डिसेंबर 2017 रोजी ब्रम्हाणी माता मंदिर, मेडता रोड (राजस्थान) येथे संपन्न होत आहे. जाजू परिवाराला एकत्रित आणण्याचा प्रयत्न गतवर्षीपेक्षा यंदा अधिक चांगला यशस्वी होईल असा विश्‍वासही जाजू यांना आहे.

जाजू हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर आहेत. सध्या ते अहमदनगर जिल्हा माहेश्‍वरी सभेचे मानद मंत्री म्हणून काम पहात असुन, गत वर्षी प्रदेश मीडिया प्रमुख पदाची जबाबदारी त्यांनी लिलया पेलली. पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, महेश फाऊंडेशन चे संस्थापक, दिशा फाऊंडेशनचे सह-सचिव, संगमनेर तालुका माहेश्‍वरी सभेचे प्रसिद्धी प्रमुख आदी पदांवर देखील ते कार्यरत आहेत.

सामाजिक कार्यात ठसा उमटविण्याचा संकल्प करून कार्यरत असलेल्या अजय जाजू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातुन काहीतरी वेगळे काम करण्याचे सन 2013 मध्ये ठरविले. आणि कार्यास सुरूवात केली. सोशल मीडियाच्या माध्यमातुन जाजू परिवाराचे संकलन सुरू सुरू असतांनाच सन 2014 मध्ये सुदर्शन जाजू (औरंगाबाद) तर सन 2015 मध्ये राकेश जाजू (इंदोर) परिचय झाला. सुदर्शन ने व्हॉटसअ‍ॅप ग्रुपची जबाबदारी स्विकारली, तर स्नेहमिलन समारंभासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे राकेश अभिवचन दिले. त्यानुसार डिसेंबर 2016 मध्ये अखिल भारतीय जाजू परिवाराचा देशातील पहिला स्नेहमिलन समारंभ संपन्न झाला. त्यासाठी 2 वर्षाच्या बालकापासुन 95 वर्षीय स्वातंत्रसैनिक शंकरलालजी जाजू (सोलापूर) अशा सर्व वयोगटातील मान्यवर उपस्थित होते.

सदर संमेलन प्राथमिक स्वरूपात फक्त भारतातील जाजू परिवारासाठी घेण्याचा मनोदय केलेल्या या त्रिमुर्तींच्या प्रयत्नांना विशेष यश लाभले. ते म्हणजे गत वर्षी संमेलनासाठी व्हिएतनाम व नेपाळ येथील जाजू परिवार देखील सहभागी झाला होता. अशाच पद्धतीने यंदा देखील परदेशातील जाजू परिवार देखील सहभागी होतील असा विश्‍वासही त्यांना आहे.

दि. 23 व 24 डिसेंबर 2017 रोजी मेडता रोड (राजस्थान) येथे माँ ब्रम्हाणी मातेची महाआरती, होम हवन, भजनसंध्या, सांस्कृतिक कार्यक्रम, महेश वंशोत्पत्ती नाटिका अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संगमनेर चे भुमिपूत्र भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शामजी जाजू हे उपस्थित रहाणार आहे. गतवर्षीप्रमाणेच पूर्ण दोन दिवसाचा वेळ त्यांनी संमेलनासाठी राखुन ठेवला आहे. तर नेपाळचे सौ.ललिता व आनंद जाजू हे आरती यजमान आहेत. आयएएस अधिकारी संजय जाजू (नविदिल्ली) हे समारंभाचे अध्यक्ष आहेत. यावेळी बी.आर.जाजू (मुंबई), रामअवतार जाजू (इंदोर), राजेंद्र जाजू (इंदोर) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दोन दिवस चालणार्‍या या समारंभासाठी देश-परदेशातील जाजू परिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे तसेच अधिक माहितीसाठी 9926312128, 9765566976 वर संपर्क साधावा असे आवाहन राजेंद्र जाजू (इंदोर), रामेश्‍वर जाजू (जोधपूर), त्रिलोक जाजू (मुंबई), रामअवतार जाजू (सुरत), द्वारकाप्रसाद जाजू (मेडता सिटी), ब्रजगोपाल जाजू (हैदराबाद), राधेश्याम जाजू, गोपाल जाजू (पुणे), बालाप्रसाद जाजू (तेलगांव), बाबुलाल जाजू (भीलवाडा), शेखर जाजू (कर्जत), रेणु जाजू (नवि दिल्ली), प्रतिभा जाजू (जळगांव), मिनल जाजू (कर्जत), पुष्पा जाजू (अमरावती), गिरीजा जाजू (जोधपूर), सीमा जाजू (मुंबई) आदींनी केले आहे.