नवले ब्रिजखाली टँकरचा भीषण अपघात
पुणे - वडगावजवळ नवले ब्रिजखाली एका टँकरचा आज दुपारी भीषण अपघात झाला आहे. टँकर सिमेंट काँक्रीटचे मिश्रण घेऊोता. नवले ब्रिजखालून जात असताना चालकाचे टँकर वरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टँकर सरळ समोरील सिरवी मिठाईवाले या दुकानावर जाऊन आदळला.
अपघातात टँकरखाली येऊन दोन महिला जखमी झाल्या आहेत. तर एकीचा मृत्यू झाला आहे. जखमी महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. यापैकी मृत तरुणी टँकरच्या मधोमध खाली अडकल्याने तिचा मृत्यू झाला.अपघातानंतर बघ्यांची बराच वेळ गर्दी जमली होती. दरम्यान, अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांनी येऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. तसेच टँकर खाली अडकलेल्या तरुणीची तातडीने सुटका केली. मात्र, तिला रुग्णालयात नेईपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.