नेवासा तालुक्याला वैभवशील तालुका बनवणार - आमदार बाळासाहेब मुरकुटे..
यावेळी जिल्हा परिषद सदस्य दत्तुभाऊ काळे , पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे , युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सतीश कर्डीले , अंकुश काळे , वसंत गरड,खराडे सर , आदींनी मनोगत व्यक्त केले .
आमदार मुरकुटे म्हणाले की नेवासा तालुका हा वैभवशील तालुका करून राज्यात एक आदर्श असा तालुका करायचा आहे . तालुक्यात तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास अंतर्गत तालुक्यातील देवस्थानांचा विकास करणार आहे व वरखेड , जेऊर आणि माका या देवस्थानांना जोडणाऱ्या रस्त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे . लवकरच निधी उपलब्ध होणार आहे आणि 60 कोटीचा हा रस्ता असून जिल्ह्यातील एक आदर्श रस्ता होणार असल्याची माहिती आमदार मुरकुटे यांनी दिली .
तसेच नेवासा तालुका हा अध्यात्मिक तालुका आहे म्हणून तिर्थक्षेत्रांचा विकास करणे हे माझे कर्तव्य आहे व असल्याचे सांगितले . विरोधकांनी खोटे आरोप बंद करावे आणि तुमचे पाच वर्षातील कामे व माझे तीन वर्षातील कामे जनतेसमोर आहे . निवडणुकींपेक्षा विकास कामे महत्वाचे असल्याचेही आमदार मुरकुटे यांनी सांगितले . ग्रामस्थांनी मंजूर झालेल्या विकास कामाबद्दल आमदार मुरकुटे यांचे आभार मानले .