Breaking News

संगमनेर शहर पोलिसांनी केली दुचाकी चोरास अटक


संगमनेर शहर पोलिसांनी काल एका दुचाकी चोरास गाडीसह त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केल्याचे आज शहर पोलिसांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी आकाश राजेंद्र काथे वय २४ रा. नवघर गल्ली संगमनेर हा काल शुक्रवार रोजी सायंकाळी साडे चारच्या सुमारास आपली होंडा कंपनीची दुचाकी क्र. एम एच १७ बी आर ९३९२ बस स्थानक परिसरात लावून बाथरूम साठी गेला असता आरोपी संदेश प्रदीप भालेराव, वय १८ रा. गणोरे ता. संगमनेर याने लबाडीने न सांगता दुचाकीचे हॅण्डल लॉक तोडून पसार झाला. 

आपली दुचाकी चोरीला गेल्याचे कळताच काथे यांनी पोलिसांना याबाबत माहीती दिली त्यानुसार आरोपी संदेश प्रदीप भालेराव विरोधात गुन्हा राजी क्र. २८५/१७ भा. द. वि. कलम ३७९ प्रमाणे दाखल करत आरोपीला अटक केली. आज दुपारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला १ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत घटनेचा पुढील तपास पो. ना. व्ही आर पवार करत आहे.