मालाडमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला !
मुंबई, - शरीर संबंधाला नकार दिल्याच्या रागातून मालाडमध्ये एका तरुणावर रॉडने हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका 24 वर्षीय तरुणा विरोधात गुन्हा दाखल केला असून तो फरार आहे. मालाडच्या सोमवार बाजार परिसरात राहणा-या शशिकांत खाके या तरुणाची तीन महिन्यांपूर्वी ’फेसबुक’ च्या माध्यमातून मालाडला राहणा-या सागर सकपाळ नावाच्या तरुणाशी ओळख झाली होती. या दोघांची चांगली मैत्री झाल्यामुळे सागर हा खाके यांच्या घरी येत-जात असे.
दरम्यान, सागर हा खाके यांच्या घरी आला असतांना त्याने खाकेकडे अनैसर्गिक संभोगाची मागणी केली. मात्र, खाकेने नकार दिल्यामुळे त्यांच्यात वाद होऊन सागरने खाकेच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केला आणि घटनास्थळावरुन पळ काढला. याची माहिती मालाड पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी मालाड पोलीस सागरचा शोध घेत आहेत.