पुण्यातील पहिल्या स्काऊट खुल्या पथकाचा जानेवारीमध्ये शताब्दी वर्ष मेळावा
पुणे, ’मुलांनी मुलांसाठी चालविलेली मुलांची चळवळ’ असे ब्रीद अंगिकारून गेली 99 वर्षे कार्यरत असलेले सदाशिव पेठेतील श्री शिवाजी कुल, पुणे हे स्क ाऊट-गाईड खुले पथक जानेवारीमध्ये शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने शताब्दी वर्षाचा मुख्य उद्घाटन सोहळा शनिवारी, (दि. 6 जानेवारी 2018) सायंकाळी 5 वाजता सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद कार्यालयासमोरील स्काऊट ग्राऊंड येथे आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन सोहळ्यासोबतच विशेष शतगौरव सन्मान, स्काऊटची नावीन्यपूर्ण प्रात्यक्षिके आणि ’श्री शिवाजी कुल - खरी कमाई’ या स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे, अशी माहिती शताब्दी मुख्य समितीचे सदस्य माधव धायगुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी नरेंद्र धायगुडे, योगिनी जोगळेकर, आनंद कुलकर्णी, सुदीप पुरोहित, निखील चिंचकर आदी उपस्थित होते. श्री शिवाजी कुलामध्ये आजमितीस वय वर्षे 4 ते 18 या वयोगटातील विविध शाळांमधील 250 हून अधिक मुले-मुली दररोज मैदानावर येत असून यंदा शताब्दीनिमित्त वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्राशी निगडीत उपक्रम राबविण्यात येणार आहेत.