Breaking News

आ. मुरकुटेनी भेट घेऊन शोकग्रस्त कुटुंबाचे सांत्वन.


नेवासा/ता.प्र./:- बेलपिंपळगाव येथील शुभम शरद शिंदे या विद्यार्थ्यांचा लातूर जिल्ह्यात अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबातील आई -वडीलाना भेटण्यासाठी ३० नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष माजी आ. पाशा पटेल व आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. या वेळी बोलताना पाशा पटेल म्हणाले की शुभम सारख्या विद्यार्थ्यांच्या जाण्याने या कुटुंबावर मोठ दुःख आहे. त्यांना यातून सावरण्यासाठी भगवंत त्यांना शक्ती देवो. या वेळी गावातील व तालुक्यातील अनेक नागरिक हजर होते.