Breaking News

खड्ड्यात बांधकाम मंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा बसवून मनसेचे आंदोलन


पुणे, दि. 30, डिसेंबर - कात्रज जुन्या बोगद्यातून पुण्याकडे येणा-या रस्त्यावर मंगडेवाडी येथील रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहेत. यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे. राज्य सरकारची खड्डे बुजवण्याची डेटलाईन संपून गेली तरी खड्डे बुजले नाहीत, याविरोधात मनसेने आज (शुक्रवारी) सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचा प्रतिकात्मक पुतळा खड्ड्यावर ठेऊन आंदोलन केले. या आंदोलनात मनसेचे नगरसेवक वसंत मोरे, साईनाथ बाबर, माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे पाटील आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.15 डिसेंबर पूर्वी महाराष्ट्रातील रस्त्यावरील खड्डे बुजले नाहीत तर मी खुर्ची टाकून काम करून घेईल. असे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान केले होते. या विधानाची आठवण करून देण्यासाठी मनसेने चंद्रकांत पाटील यांचा प्रतिकात्मक पुतळा खुर्चीवर ठेवून निषेध नोंदवला.