Breaking News

छंदामुळे 'तो' महिन्याला कमावतो लाखो रुपये

लंडन : आजपर्यंत आपण कोणाला नाणी जमा करणे असो किंवा एखाद्या पुस्तकाचा साठा करणे किंवा एखाद्या वस्तूचा संग्रह करण्याचा छंद असलेले व्यक्ती पाहिले आहेत; परंतु लंडनमधील एका इसमाला चक्क गाड्यांचा रिव्ह्यू लिहिण्याचा छंद आहे आणि त्याच छंदाला त्याने पैसे कमविण्याचे अनोखे साधन बनविले आहे. त्यामुळेच तो सोशल मीडियाच्या माध्यमातून महिन्याला लाखो रुपये कमवितो. 


ते झालं अंस की, लंडनमध्ये राहणारा टॉम एक्स्टोन (३०) याला गाड्यांचा रिव्ह्यू लिहायचा अनोखा छंद जडला. लहानपणापासूनच त्याला गाड्यांविषयी आवड होती. त्यामुळे विविध गाड्यांची टेस्ट ड्राइव्ह करून त्याने सुरुवातीला ब्लॉग लिहायला सुरुवात केली. 

हे रिव्ह्यू तो सोशल मीडियावर अपलोड करीत होता. त्याच्या या रिव्ह्यूमुळे सोशल मीडियावर त्याचे चाहते वाढत गेले. कालांतराने त्याने हे रिव्ह्यू व्हिडीओ स्वरूपात करणं सुरू केलं. त्यामुळे त्याच्या फॉलोवर्समध्ये आणखी वाढ झाली. त्याचे सबस्क्रायबर्स वाढत गेले. आता तो महिन्याला तब्बल ६ लाखांपेक्षाही अधिक कमाई करतो.