Breaking News

नोटबंदीच्या काळात वाहन चालक झाला मालामाल!


अहमदनगर प्रतिनिधी  - ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेली नोटबंदी सोनई येथील वाहन चालकाच्या चांगलीच पथ्यावर पडली. जावेद शेख या वाहन चालकाची या काळात कमालीची ‘चांदी’ झाली. नोटबंदीच्या या ‘लगीनघाई’त या चालकाने सोनईत पाच ते सहा गाळे, शिंगणापूर परिसरात दोन प्लॉट, राहुरी रस्त्यालगत एक फ्लॅट, एक बंगलो, आधुनिक ग्राइंडर दुकान अशी करोडोंची ‘माया’ जमविली. त्यामुळे अवघ्या १३ हजार रुपये पगार असलेल्या या वाहनचालकाने एवढी माया कोठून गोळा केली, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विश्वास वैरागर यांनी पुण्याच्या साधू वासवानी चौकातील इन्कम टॅक्स कार्यालयात केली. 
दिवाळीच्या तोंडावर {दि. ८ नोव्हेंबर २०१६} झालेल्या नोटबंदीच्या काळात करण्यात आलेल्या ‘उलाढाली’त मुख्य पेठेतील दुकानात कामावर असलेले या दुकानदाराचे अत्यंत निष्ठावंत, विश्वासू कामगार भाकरे आणि टिक्कल या दोघांचा सिंहाचा वाटा होता, अशीही माहिती हाती आली आहे. दरम्यान, या काळात ज्या मोबाईलद्वारे {क्र. ९७६७६३२८४६} नोटबंदीसाठी अनेक लोकांना संपर्क साधण्यात आला, त्या मोबाईल नंबरचे कॉल डिटेल्स घ्यावेत आणि दुकानातील या प्रमुख दोन कामगारांची चौकशी करण्यात यावी. 

त्याचप्रमाणे कांगोणी, धनगरवाडी, हनुमानवाडी. श्रीरामवाडी आदी ठिकाणच्या राजकीय कार्यकर्त्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही वैरागर यांनी या कार्यालयात दिलेल्या निवेदनाद्वारे केली. दरम्यान, एका तक्रारी पीएम कार्यालयातही ऑनलाईनद्वारे त्यांनी पाठविल्या. शेख याने अंबिकानगर येथे एक फ्लॅट, कांगोणी रस्त्यालगतच्या कॉम्प्लेक्समध्ये पाच ते सहा गाळे, फ्लॅट आणि प्लॉट खरेदी करण्यासाठी पैसे कोठून आणला, त्याचे त्याचे वार्षिक उत्पन्न किती या सर्व परिस्थितीची सक्तवसुली संचालनालयामार्फत {ईडी} सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या दुकानावर १२ डिसेंबर २०१६ रोजी नगर येथील कामगार न्यायालयाची धाड पडली होती. याची या विभागाने सोनई पोलिसांना कल्पना दिली होती.

राष्ट्रीयीकृत बँकांच्या आरबीआयकडे तक्रारी
सोनईतील युनियन बँक, महाराष्ट्र बँक, स्थानिक अर्बन बँक या राष्ट्रीयीकृत बँकांमधील उपरोल्लेखित राजकीय कार्यकर्त्यांच्या खात्यावर नोटबंदीच्या काळात लाखो रुपये टाकण्यात आले. त्यामुळे या बँकांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे तसेच या सर्वांच्या व्यवहाराची सखोल करण्यासह येथील राष्ट्रीयीकृत बँकांच्या विरोधात वैरागर यांनी आरबीआयकडे तक्रारी केल्या आहेत. यात भेंड्यातील एका मल्टीस्टेट पतसंस्थेचाही समावेश असल्याचे ते म्हणाले.