बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा जेरबंद
संगमनेर/प्रतिनिधी।०८ संगमनेर शहर व परिसरात काही दिवसांपासून बेकायदेशीररित्या होणाऱ्या वाळूचोरीच्या घटना वाढत असतांना आज {दि.८} शहर पोलिसांनी या वाळू चोरांवर धडक कारवाई करत एकास रिक्षा व वाळूसह बेकायदेशीर वाहतूक करतांना अटक केली.
याबाबत कोतवाल संजय लक्ष्मण शिरसाट यांनी फिर्याद दिली. दरम्यान, गाढवावरून वाळू वाहतूक करत असतांना गाढवे कळपाने रस्त्यावर चालत असतात. त्यामुळे संपूर्ण रस्ताच जाम होऊन बसतो. पोलीस व महसूल प्रशासनाने या चुरमुट कारवाया करून न थांबता अशा वाळूतस्करांचा मुळापासून सफाया करणे गरजेचे आहे.
