Breaking News

बिहारमध्ये नक्षलवाद्यांचा रेल्वेस्थाकांवर हल्ला

पटना : बिहारमधील मसूदन रेल्वेस्थानकावर नक्षलवाद्यांनी हल्ला करून रेल्वे स्थानकाला आग लावली. त्यानंतर या नक्षलवाद्यांनी रेल्वेचे सहाय्यक स्टेशन मास्तर आणि एका रेल्वे कर्मचाऱयांचे अपहरण करून पळून गेले. या घटनेमुळे संपूर्ण बिहार हादरून गेले आहे. 


मंगळवारी रात्री 11.30 वाजता नक्षलवाद्यांनी मसूदन रेल्वे स्टेशनवर हल्ला चढविला. दोन रेल्वे कर्मचाऱयांचे अपहरण करतानाच रेल्वेच्या सिग्नलिंग पॅनेलसह रेल्वेच्या इतर मालमत्तांना आग लावली. दरम्यान, नक्षलवाद्यांचा हल्ला होताच सहाय्यक स्टेशन मास्तरने त्यांच्या अपहरणापूर्वी मालदा डिआरएमला फोन करून या हल्ल्याची माहिती दिली होती. मसूदन रेल्वेस्थानकावर टेन आल्यानंतर नक्षलवादी प्रवाशांना ठार करतील,’ असे या स्टेशन मास्तरने डिआरएमला कळवले होते. त्यानंतर लगेचच रेल्वेस्थानकावर अनाऊन्समेंट होऊन या हल्ल्याची प्रवाशांना सूचना देतानाच त्यांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आले.