तापमानाचा पारा 6 अंश सेल्सिअसवर
मुंबई : राज्यात तापमानाचा पारा कमालीचा खाली जाताना दिसतो आहे. परभणीचे बुधवारचे किमान तापमान तर चक्क 6 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. तर दुसरीकडे नागपूर आणि पुण्यात किमान तापमान 9 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं.
राज्याची राजधानी मुंबईचे तापमान 20 अंश सेल्सिअस इतके होते. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगरचा पारा 11 अंशांपर्यंत खाली आला. नांदेड आणि वाशिममध्येही 10 अंशांपर्यंत तापमान खाली घसरले. तर जळगाव, अकोला अमरावती या जिल्हयांमध्ये पारा 14 अंशांवर आला. राज्याच्या बहुतांश भागाला थंडीने हुडहुडी भरली असून, ग्रामीण भागात सकाळी सकाळी धुके पडलेले बघायला मिळतं आहे. ठिकठिकाणी पहाटे आणि भल्या सकाळी लोक शेकटोची ऊब घेताना दिसत आहेत.