राणी पद्मावतीवर येणार आणखी एक चित्रपट!
संजय लीला भन्साळींच्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या पद्मावतीची अद्याप या वादातून सुटका झाली नाही, तोच राणी पद्मावतीवर आता आणखी एक चित्रपट सुरू होणार आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार मैं हँ पद्मावती नावाने बनत असलेल्या या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट राजस्थानच्या एका लेखकाने लिहिला आहे जेणेकरून हादेखील कुठल्या वादात न अडकावा, जसा भन्साळींचा पद्मावती अडकला आहे. चित्रपटाचे निर्माता अशोक शेखर यांनी अशाप्रकारचा चित्रपट येत असल्याच्या वृत्ताला दुजोरा देताना म्हटले की, या चित्रपटात सर्व नवीन चेहरे घेण्यात येणार आहेत.
हा चित्रपट हिंदी व राजस्थानी भाषेमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. दरम्यान, दीपिका पदुकोण, शाहीद कपूर व रणवीर सिंग यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट पद्मावतीला अनेक राजकीय संघटना व राजकीय पक्षांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे