Breaking News

बँक समजून ग्रामपंचायत कार्यालय फोडण्याच्या प्रयत्न,एक चोर पकडला

मिरजगाव/प्रतिनिधी /- मिरजगाव मधील बँक समजून ग्रामपंचायत कार्यालय फोडण्याच्या प्रयत्नात स्थानिक तरुणांच्या सतर्कतेमुळे दिगंबर किसान ससाणे (रा. वटलुज टी. ता.दौंड) हा चोर जागेवर पकडला. तर गोंधळाचा फायदा घेवून धनंजय चंद्रकांत गोंदवळ (रा.यवत) हा चोर पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र कोणतीही चोरी न झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. 


गुरुवार दि. ३० सप्टेंबर १७ रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास मिरजगावमधील क्रांती चौकातील ग्राम सचिवालयातील दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयात दोन चोरटे घुसले होते. त्यावेळी चोरट्यांनी आपल्याकडील कटावणीने कुलूप तोडले. मात्र तरीही दार उघडत नव्हते. त्यामुळे चोरट्यांनी या कार्यालयातील जाड काच फोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. 

मात्र ग्रामपंचायतच्या खालील बाजूला महामार्गालगत चौकातील तरुण गप्पां मारत असताना अचानक काच फुटल्याच मोठा आवाज आल्याने परिसरात असलेल्या तरुणांनी बँकेच्या दिशेने धावत जावून पाहिले. तेव्हा त्यांना बँकेच्या दरवाजे बंद दिसले. परंतु बँकेच्या व ग्रामपंचायत सभागृहाचे मधे उभे राहिले असता एक मिटरच्या अंतरावर सभागृहाची अर्धा इंच जाडीच्या काचेचे तुकडे पडलेले दिसले त्यावेळी मोठा गोंधळ उडाला.न याचा फायदा घेवून धनंजय गोंदवळ हा आपल्याकडील दुचाकी घेवून फरार झाला.

मिरजगाव येथील ग्रामसचिवालयात बँक ऑफ महाराष्ट्र व रुक्मिणी सहकारी बँक आहे. या चोरट्यांचा या बँकाकडेच मोर्चा होता का? ग्रामपंचायत मधील काही महत्त्वाचे कागदपत्रे घेऊन जायचे. हा संशोधनाचा व चर्चेचा विषय गावात बनला आहे.मात्र चोराच्या लक्षात न आल्याने बँक समजून त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात प्रवेश केला. त्यामुळे कोणताही अनर्थ घडला नाही. वास्तविक मिरजगाव मधील क्रांती चौक महामार्गावरील सततचा वर्दळीचा भाग आहे. 


त्यातच साचीवालया समोरील जिल्हा परिषदेच्या शाळेत किर्तनाचा कार्यक्रम चालू होता. तरीही मध्यवस्ती मध्ये हा प्रकार घडल्याने दहशतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळावरून कटावणी, टॉमी, पाने व स्क्रू ड्रायव्हर असे साहित्य पोलिसांना सापडले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी एका चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश बाबर, दत्तात्रय कासार हे पुढील तपास करत आहेत.