Breaking News

गरम मिक्सरच्या टाकीत पडल्याने कामगाराचा गंभीर भाजून मुत्यु.

(समीर शेख) जामखेड/ता.प्रतिनिधी/- साखर कारखान्याच्या रात्रीच्या शिफ्ट मध्ये काम चालू असतांना रात्री 1.30 वाजता गरम मिक्सर च्या टाकीमध्ये पडुन एका कामगाराचा गंभीर भाजल्याने भीषण मृत्यू झाला.त्या कामगाराचे नांव विनोद अंकुश मोरे,(वय १९ वर्षे, रा गांधनवाडी, ता.पाटोदा )आहे. ही दुर्घटना जामखेड तालुक्यातील हळगाव येथील श्रीराम शुगर कारखान्यात घडली.


मयत विनोद मोरे हा परांडा तालुक्यातील चिंचपूर या ठिकाणी आपल्या बहीनीकडे रहात होता.तर त्याचे आईवडील हे मुंबई या ठिकाणी रहात आहेत. त्याचे मेव्हणे शिवाजी झांबरे हे हळगाव येथील जयश्रीराम शुगर एन्ड अॅग्रो प्रोडक्ट लिमिटेड या कारखान्यात नोकरीस होते. विनोद देखील पंधरा दिवसापुर्वी रोजीरोटीसाठी दि १२ नोव्हेंबर रोजी या कारखान्यात उत्पादन विभागात कामाला लागला होता.नेहमी प्रमाणे आज दि १ डिसेंबर रात्री तो आपल्या कामगारांसमवेत (सेंट्री फयुगल)च्या जवळ जेथे साखरेवर प्रक्रिया होऊन ती बाहेर पडते. त्या ठिकाणी असलेल्या मिक्सर जवळ काम करत होता


.या वेळी त्याचे इतर कामगार हे वरील मजल्यावर काम करत होते.मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास विनोद अंकुश मोरे (वय १९ वर्षे) हा मिक्सर जवळ काम करत आलेल्या टाकीत पडला.या वेळी अचानक आवाज झाल्याने वरील कामगार धावत मिक्सर च्या टाकीकडे आले. त्याला ओढुन बाहेर काढले.तातडीने त्यास उपचारासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले.मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. गेल्या वर्षी सुद्धा ह्याच श्रीराम शुगर कारखान्यात तीन मजूर मुलाच्या अंगावर अॅसीड पडल्याने ते मजूर भाजले होते. त्या मजूराना हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले.

 तेथे त्यांना मलम पट्टी करून हॉस्पिटल चे बिल भरले. श्रीराम शुगर या कारखान्यातच ह्या घटना घडतात कसे काय? अशी चर्चा तालुक्यात चालू आहे. कारखाना चे मॅनेजर यांचे मजूर कामगार यांच्या कडे लक्ष आहे का नाही?अशा चर्चा जामखेड तालुक्यात पण चालू आहे. दुर्घटना घडल्याची समजताच परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम,जैन कॉन्फरन्स चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, वकील संघाचे अध्यक्ष अॅड हर्षल डोके, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब पोकळे, पोलिस उपनिरीक्षक सहारे व नगर हुन पण पोलिस राखीव दल घटनास्थळी सकाळी हजर झाले.

 साखर कारखान्याला छावणीचे स्वरूप आले होते. घटनास्थळी यावेळी कारखान्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.येथील कारभार कारखान्याचे कार्यकारी संचालक निंबे व मॅनेजर एस जे गाढवे हे पहात आहेत. या बाबत जामखेड पोलिस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी मयत विनोद मोरे याच्या आई वडीलांना कारखान्याकडुन १५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अशी माहिती श्रीराम शुगर साखर कारखान्याचे मॅनेजर यांनी दिली