Breaking News

खर्च आराखडा मंजूर झाल्यानंतरच शाळा बंद

सिंधुदुर्गनगरी, दि. 17, डिसेंबर - कमी पटसंख्येमुळे शाळा बंद केल्यावर समायोजित शाळेत जाण्या -येण्याचा प्रति विद्यार्थी प्रवास खर्च आराखडा प्रथम तयार करून त्याला शासनाकडून मंजूरी मिळाल्यावरच कमी पटसंख्येची शाळा बंद करावी असा निर्णय आजच्या जि.प.च्या शिक्षण समिती सभेत घेण्यात आला.


जिल्हा परिषद शिक्षण समितीची मासिक सर्वसाधारण सभा शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै समिति सभागृहात पार पडली. जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या 153 प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी नजिकच्या शाळेत समायोजित करून त्याबाबतचा अहवाल देण्याचे आदेश शासनाने शिक्षण विभागाला दिले आहेत. मात्र अन्तराच्या निकषामुळे जिल्ह्यातील 19 शाळांच बंद होणार आहेत. 

या शाळांमधील विद्यार्थ्यांची दुसर्‍या शाळेत जाण्याची सोय करण्यासाठी आवश्यक प्रवास खर्चचा आरखडा तयार करून शासनाकड़े पाठवण्याची मागणी सतीश सावंत यानी केली. त्यानुसार कार्यवाही करून आराखडा सादर करावा व ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जिल्ह्यातील एकही शाळा बंद न करण्याचा आदेश सभापती प्रितेश राऊळ यानी दिले.