Breaking News

दहशतवाद्याचा मृतदेह आढळला .

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात शनिवारी कुख्यात दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याचा मृतदेह आढळला. गुप्त सूचना मिळाल्यानंतर पोलीस दलातर्फे त्राल भागात शोधमोहीम सुरू असताना एक मृतदेह ताब्यात घेण्यात आला. 


आयईडी स्फोटक तयार करताना या दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी ताब्यात घेतलेला मृतदेह जैश-मोहम्मदच्या दहशतवाद्याचा असल्याची माहिती पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी दिली.